भाजपची शिवसेनेला 31 जानेवारीपर्यंतची डेडलाइन

bjp
मुंबई – भाजपने सत्तेत राहून नेहमी विरोधकांच्या भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून भाजपने शिवसेनेला लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची की नाही यासाठी डेडलाइन दिली आहे. 31 जानेवारीपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचार करुन आपला निर्णय कळवण्यास भाजपने सांगितले असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजप गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या निर्णयाची वाट पाहत आहे. वारंवार शिवसेनेकडून टीका होत असतानाही भाजपने मात्र सबुरीची भूमिका घेतली होती. पण भाजपने अखेर आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. बुधवारी संध्याकाळी दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक पार पडली. भाजपध्यक्ष अमित शाह यांनी यावेळी शिवसेनेच्या अवास्तव मागण्या मान्य करण्यासाठी पक्ष झुकणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर ठराविक वेळेपर्यंतच शिवसेनेच्या निर्णयाची वाट पाहू असेही सांगितले.

अमित शाह यांनी महाराष्ट्रात युती करायची असेल तर काही गमावून करणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याचीही भाजपची तयारी असल्याचेही अमित शाह यांनी म्हटले आहे. या बैठकीत शाह यांनी खासदारांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत नारायण राणेही उपस्थित होते.

Leave a Comment