तुम्ही पाहिला का करण जोहरच्या ‘ड्राईव्ह’चा टीझर ?

drive
बॉलिवूडचा डॅडी म्हणजेच दिग्दर्शक करण जोहर हा नववर्षात पुन्हा एकदा धमाका करण्यास तयार झाला असून तो लवकरच सुशांत सिंग राजपुत आणि जॅकलिन फर्नांडीस यांना घेऊन ‘ड्राईव्ह’ हा चित्रपट बनवणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर करण जोहरने शेअर केला आहे. हा चित्रपट २८ जुनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अपुर्व मेहता हे या चित्रपटाची निर्मीती करणार आहेत. तर या चित्रपटाची कथा तरूण मानसुखानी यांनी लिहिली आहे. हा टीझर शेअर करून करणने यावर ‘ऑन युवर मार्क गेट सेट गो’, असे कॅप्शन दिले आहे. चित्रपटाच्या टीझरवरून हा एक बाईक राईड्सवर आधारित चित्रपट असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment