पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आलिया, वरूण ?

varun-dhawan
मोठ्या प्रमाणात आलिया भट्ट आणि वरून धवन यांची ऑनस्क्रिन जोडीची लोकप्रियता पाहायला मिळते. ‘स्टुडंट ऑफ द ईयर’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ यांसारखे सुपरहिट चित्रपट या दोघांनी बॉलिवूडला दिले आहेत. आता ही ऑनस्क्रिन जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, डेव्हिड धवनच्या आगामी ‘कुली नंबर वन’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरूण आणि आलिया ही जोडी झळकणार आहेत. रोहीत धवन या चित्रपटाची निर्मीती करणार आहे. या चित्रपटात सुरुवातीला सारा अली खान भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा होत्या. पण या चित्रपटात आता आलियाची वर्णी लागली असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी डेव्हिड धवनसोबत वरूण धवनने ‘जुडवा-२’ आणि ‘मै तेरा हिरो’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. आता ‘कुली नंबर वन’च्या रिमेक मध्ये पुन्हा एकदा वरूण धवन वडिलांच्याच चित्रपटात झळकणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. आलिया आणि वरूण दोघेही सध्या ‘कलंक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यासोबतच रेमोच्या चित्रपटातही वरूण धवन झळकणार आहे. तर, आलिया ही ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘गली बॉय’ चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Comment