
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे. शाहरुख खान सारे जहाँ से अच्छा असे शीर्षक असलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून येत्या फेब्रुवारीमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
फेब्रुवारीमध्ये सुरु होणार शाहरुखच्या ‘सारे जहाँ से अच्छा’चे चित्रिकरण
मे किंवा जूनमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. पण किंग खानने झिरो चित्रपटाच्या अपयशानंतर यातून बाहेर येण्यासाठी स्वतःला व्यग्र करुन घेण्यासाठी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला फेब्रुवारीतच सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर या चित्रपटात राकेश शर्मा यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुख खान, रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
