भाजपमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा प्रवेश

mausami-chatterjee
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी प्रवेश असल्याची घोषणा पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी केली आहे. चॅटर्जी यांचीही यावेळी उपस्थिती होती.

आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याने अत्यंत आनंदी आहोत. आपल्याला पक्ष जी कुठलीही जबाबदारी देईल. त्याला आपण पूर्ण गंभीरपणे पार पाडू, असेही चॅटर्जी म्हणाल्या. पंतप्रधान मोदींच्या कामापासून मी फार प्रभावित झाले आहे. गेल्या ५ वर्षांत मोदींनी देशाचा प्रचंड विकास केला असल्याचेही यावेळी बोलताना चॅटर्जी यांनी सांगितले. जे काही पंतप्रधान मोदी बोलतात, ते करून दाखवतात, असेही त्या म्हणाल्या.

लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. तुम्ही निवडणूक लढवणार का, या प्रश्नाला उत्तर देताना चॅटर्जी म्हणाल्या की, मी निवडणूक लढवणार की नाही, यावर आताच काही सांगणे कठीण आहे. मात्र, मी आता भाजपमध्ये आली आहे. त्यामुळे नक्कीच काही करून दाखवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. २०१९ला पुन्हा एकदा एनडीएचे सरकार बनावे आणि मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी आपली इच्छा असल्याचेही चॅटर्जी यांनी सांगितले.

Leave a Comment