रिषभ पंत ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या मुलांसाठी झाला ‘बेबीसीटर’!

rishabh-pant
मुंबई : 21 वर्षांच्या रिषभ पंतची टीम इंडियाची बेबी म्हणून ओळख करुन देण्यात येत असली, तरी तो याच वयात लहान मुलांना सांभाळण्याएवढा समंजस झाला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘बेबीसीटर’ रिषभ पंतचा फोटो वायरल झाला आहे.

यष्टिरक्षक रिषभ पंत आणि कर्णधार टिम पेन यांच्यात मेलबर्न कसोटीत शाब्दिक चकमक उडाली होती. पेनने त्यावेळी पंतला आपल्या मुलांचा बेबीसीटर म्हणून सांभाळ करण्याचा सल्ला दिला होता. तर पेनला ‘तात्पुरता कर्णधार’ म्हणून पंतने हिणवले होते. तू बेबीसीटींग करतोस का? माझ्या बायकोला मी एखाद्या रात्री घेऊन सिनेमाला जाईन. तू तेव्हा माझ्या मुलांचा सांभाळ कर, असे म्हणत फलंदाजी करणाऱ्या रिषभला पेनने डिवचले होते. पेनचा सल्ला पंतने किंबहुना ‘स्लेजिंग’ फारच मनावर घेतल्याचे दिसते. कारण चक्क पेनची पत्नी बोनीनेही लहान मुलांना सांभाळण्याच्या रिषभ पंतच्या कौशल्याचे कौतुक केले.

रिषभ पंतने आपल्या लेकाला उचलून घेतल्याचा फोटो बोनीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बोनीने त्या फोटोखाली सर्वोत्तम बेबीसीटर म्हणून रिषभ पंतचा उल्लेख केला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या निवासस्थानातील हे छायाचित्र आहे.

Leave a Comment