पंतप्रधान मोदींच्या सभेवेळी काळ्या रंगाच्या वस्तूंवर बंदी

narendra-modi1
मेदिनीनगर : झारखंडमधील पलामू जिल्ह्यात शनिवारी पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी सभेत त्यांना काळे झेंडे दाखविले जाण्याच्या शक्‍यतेमुळे धास्तावलेल्या पोलिस प्रशासनाने आता सभेवेळी काळ्या रंगाचे कपडे, पिशव्या, पर्स आदींसह काळ्या रंगातील सर्व वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक इंद्रजित महाता यांनी दिली.

यावेळी पोलीस अधिक्षक महाता यांनी स्पष्ट केले की, मोदींच्या सभेवेळी काळ्या रंगांच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी काळे कपडे, काळी पर्स – पिशव्या असलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. सभेला येणारे नागरिक आणि अधिकाऱ्यांनाही हा नियम लागू केला जाणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून झारखंडमध्ये विविध मागण्यांसाठी विशेष शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मोदींच्या सभेत काळे झेंडे दाखविण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या संघटनेकडून दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी मोदींच्या सभेत काळ्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

Leave a Comment