क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम वनडे संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे

virat-kohli
सिडनी – २०१८ च्या ‘वनडे टीम ऑफ द इयर’ची घोषणा क्रिकेट विश्वातील मात्तबर क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या या सर्वोत्तम एकदिवसीय संघात ११ पैकी ४ खेळाडू हे भारतीय असून भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे एकाही कांगारू खेळाडूचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. भारताच्या विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फिरकीपटू कुलदीप यादव आणि सलामी फलंदाज रोहित शर्माला यामध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त, या संघात इंग्लंडचे ३ तर बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीजसंघातील प्रत्येकी एका खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. या संघात एकाही न्यूझीलंडच्या एकाही खेळाडूला स्थान देण्यात आले नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ‘वनडे टीम ऑफ द इयर’ – रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, जो रुट , विराट कोहली (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जोस बटलर (यष्टीरक्षक), थिसारा परेरा, राशिद खान, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुस्तफिजूर रहमान.

Leave a Comment