2018मध्ये रोहित शर्माने घेतले सर्वाधिक झेल

rohit-sharma
सिडनी – २०१८ हे वर्ष टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरले. मागील वर्षात फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलूंची कामगिरी वाखण्याजोगी होती. दिवसेंदिवस भारतीय संघाचे क्षेत्ररक्षणही उत्तम होत आहे. पूर्वी ढिसाळ क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघ क्षेत्ररक्षणात नवी ओळख तयार करत आहे. काही उत्तम झेल पकडत भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम केला आहे. भारताकडून २०१८ या वर्षात रोहित शर्माने सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम केला आहे.

आपण दर्जेदार क्षेत्ररक्षक असल्याचे नेतृत्त्व आणि फलंदाजीत नावाल लैकिक कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माने दाखवून दिले आहे. १९ सामन्यात त्याने ११ झेल पकडले आहे. त्यात एका सामन्यात ३ झेल पकडण्याचा विक्रमही केला आहे. भारताकडून सर्वाधिक झेल पकडण्यात तो पहिल्या स्थानी आहे.

त्याचबरोबर गब्बर या नावाने प्रसिध्द असलेला सलामीचा फलंदाज शिखर धवनने १९ सामन्यात १० झेल पकडले आहेत. याच वर्षी त्याने एकाच सामन्यात ४ झेल पकडण्याचा विक्रम केला आहे. फलंदाजीत दाद असणाऱ्या विराटने आपल्या क्षेत्ररक्षणानेही साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. त्याने १४ सामन्यात ९ झेल पकडले आहे. त्याने एकाच सामन्यात २ झेल पकडले आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने अष्टपैलू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. त्याने याच वर्षी १० सामन्यात ७ झेल पकडले आहे.

Leave a Comment