
पंबा – शबरीमला अय्यप्पा मंदिरात दोन महिला भाविकांनी प्रवेश केल्याचा दावा केला असून या महिलांचे बिंदू आणि कनकदुर्गा असे नाव आहे. त्यांनी पहाटे ३.४५ला पोलिसांच्या मदतीने मंदिरात प्रवेश केल्याचे सांगितले. मंदिरात जाऊन त्यांनी प्रार्थनाही केली. या दोन्ही महिला चाळीशीतील असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी त्यांनी १८ डिसेंबरलाही शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना आक्रमक आंदोलकांमुळे मंदिरात प्रवेश करणे शक्य झाले नव्हते.
दोन भाविक महिलांचा शबरीमला मंदिरात प्रवेश
सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८ मध्ये सर्व वयोगटातील महिलांना अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला होता. पण कट्टर परंपरावाद्यांच्या निषेधामुळे अद्यापपर्यंत एकही महिला मंदिरात प्रवेश करू शकली नव्हती.
