पाकिस्तानी सुपरमॉडेलची नकली अंबानी पार्टी

fakeparty
पाकिस्तानची सुपरमॉडेल आलीय जैदी हिने कराची येथे अंबानी थीमवर एक पार्टी आयोजित केली होती. भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांनी कन्या इशाच्या विवाहानिम्मित ज्या बड्या पार्ट्या दिल्या त्याचा अनुभव घेता यावा हा त्यामागे उद्देश होता असे तिचे म्हणणे आहे. या पार्टीत बिग बी, ऐश्वर्या राय व अन्य बॉलीवूड स्टार्स चे मुखवटे घालून अनेक लोक आले होते. या पार्टीला पाक टीव्ही उद्योगातील अनेकांनी हजेरी लावली.

या पार्टीत प्रसिद्ध गायिका बियोन्से सारखा ड्रेस घालून आलीयाची मैत्रीण मॉडेल फ्रेहा अल्ताफ हिने पर्फोर्म केले. पार्टीच्या ठिकाणी १० कोटी डॉलर्स पार्टी, २६ कॅरेटचे सोन्याची भिंत, २ कोटीचा हत्ती, अश्या पाट्या लावल्या गेल्या होत्या. आलीया सांगते, भारत आणि पाकिस्तानच्या परंपरा, संस्कृती, आवडीनिवडी, संगीत बरेचसे सारखे आहे. अंबानी यांच्या प्रमाणे पाकिस्तानात विवाह सोहळे अनेक दिवस चालतात. त्यामुळे आम्ही अश्या बड्या पार्टीचा अनुभव घेण्यासाठी हि नकली पार्टी ठेवली होती. त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

Leave a Comment