नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतात जन्मली ६९९४४ बाळे

babies
नवीन वर्षाचा पहिला दिवस भारतासाठी निराळ्या कारणाने चर्चेचा ठरला आहे. संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या माहितीनुसार या दिवशी भारतात ६९९४४ बालके जन्माला आली असून याबाबतीत भारताने चीनला पछाडले आहे. चीनमध्ये या दिवशी ४४९४० बालके जन्माला आली.

या यादीत तीन नंबरवर नायजेरिया असून तेथे २५६८५ तर चार नंबरवर असलेल्या पाकिस्तानात १५१२२ बालकांनी जन्म घेतला. इंडोनेशियाचा या यादीत पाचवा नंबर असून तेथे १३२५६ बालके जन्मली. भारताची लोकसंख्या १.३ अब्ज असून ज्या वेगाने भारताचा जन्मदर वाढत आहे त्यानुसार २०२४ पर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असेल असा अंदाज संयुक्त राष्ट्राने वर्तविला आहे.

Leave a Comment