शंभर कोटीच्या क्लबमध्ये दाखल झाला सिम्बा

simmba
बॉक्स ऑफिसवर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपट घसघशीत कमाई करत असून प्रेक्षकांना रणवीर सिंगचा दमदार अभिनय आणि सारा अली खानसोबतची केमेस्ट्री फार भावत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला असून १०० कोटी क्लबमध्ये या चित्रपटाची एन्ट्री झाली आहे.

पहिल्याच दिवशी ‘सिम्बा’ने २० कोटीची कमाई केली होती. आठवड्याच्या शेवटीदेखील प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला. भारतातच नाही, तर विदेशातही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. रणवीरचा ‘पद्मावत’नंतर ‘सिम्बा’ चित्रपट हा दुसरा शंभरी पार करणारा चित्रपट ठरला आहे.

जवळपास ८० कोटींचे ‘सिम्बा’चे एकुण बजेट होते. पहिल्या दिवशी २० कोटींची दमदार ओपनिंग करत सिम्बाच्या कमाईत सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी वाढ झालेली दिसली. या चित्रपटाने आत्तापर्यंत १३२ कोटींची कमाई केली आहे. येणाऱ्या आठवड्यातही चित्रपटाला टक्कर देणारा दुसरा कोणता चित्रपट नसल्यामुळे त्याचा फायदाही चित्रपटाला होऊ शकतो. त्यामुळे सिम्बाच्या कमाईच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

या चित्रपटातून रोहित शेट्टीने त्याच्या आगामी ४ चित्रपटांचेही संकेत दिले आहेत. गोलमाल-५, सिंघम-३, सिम्बा-२ आणि सुर्यवंशी हे त्याचे आगामी चित्रपट असतील, एखाद्या चित्रपटातून आपल्या आगामी चित्रपटांचे अशाप्रकारे प्रमोशन पहिल्यांदाच करण्यात आले आहे.

Leave a Comment