कॅटरिनाचे बहिणींसोबत लंडनमध्ये नव्या वर्षाचे सेलिब्रेशन

katrina-kaif
अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी २०१८ वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत केले. नव्या वर्षाचे सेलिब्रेशन कॅटरिना कैफनेही लंडनमध्ये केले. सोशल मीडियावर तिच्या बहिणींसोबत धमालमस्ती करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.


कॅटरिनाला ६ बहिणी आणि १ भाऊ असल्यामुळे तिला जेव्हाही वेळ मिळतो, ती तेव्हा तिच्या बहिण-भावांसोबत वेळ घालवत असते. तिने लंडनमध्ये नदी किनाऱ्यावर तिच्या बहिणींसोबत धमाल वेळ घालवला. तिने या व्हिडिओला लंडनमधल्या कडाक्याच्या थंडीतही पाण्यात पोहण्याची मजा काही औरच, असे कॅप्शन दिले आहे.

तिने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एक खास फोटो शेअर करून चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटातून कॅटरिना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती अलिकडेच शाहरुखच्या ‘झिरो’ चित्रपटात झळकली. पण प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद ‘झिरो’ला मिळाला नाही. मात्र, कॅटरिनाने सकारलेल्या बबिता कुमारीच्या पात्राचे सर्वांनी कौतुक केले. आता ‘भारत’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment