
प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘एबीसीडी’ चित्रपटाला मिळाला. प्रभूदेवा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. तर, यानंतर आलेल्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना वरुण धवन आणि श्रद्धा कपूरची जोडी पाहायला मिळाली. या चित्रपटाचा आता तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘एबीसीडी ३’ मध्ये वरुण धवनसोबत ‘ही’ अभिनेत्री शेअर करणार स्क्रिन !
वरुण धवन ‘एबीसीडी’च्या तिसऱ्या भागात मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची घोषणा रेमोने काही दिवसांपूर्वी केली होती. तर, अभिनेत्री कॅटरिना कैफ वरुणसोबत झळकणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तारखेची कॅटरिनाला अडचण होत असल्याने चित्रपटात काम करण्यास तिने नकार दिला आहे. त्यानंतर एबीसीडी ३ साठी जॅकलीन फर्नांडिस आणि कृती सेनन या अभिनेत्रींचा विचार करण्यात आला आणि अखेर श्रद्धा कपूरच्या नावावर मोहोर लावली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ४D मध्ये केले जाणार आहे.
