आलिया आणि रणवीरच्या ‘गली बॉय’चे नवे पोस्टर रिलीज

gully-boy
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला झोया अख्तर यांचे दिग्दर्शन असलेला ‘गली बॉय’ चित्रपट येणार आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या चित्रपटाचे नवे पोस्टर आलिया आणि रणवीरने शेअर केले आहे.


या फोटोला ‘अपना टाईम आएगा’ असे कॅप्शन दिले गेले आहे. रणवीरचा पाठमोरा लूक यात पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या पोस्टरसोबतच प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर केली गेली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


चित्रपटात मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांची परिस्थिती कशा प्रकारे असते, याची कथा मांडली आहे. यात त्यांचा संघर्ष दाखवला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या ‘ब्रह्मास्त्र’चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आलिया व्यस्त आहे. तर रणबीर नुकताच सिम्बा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Leave a Comment