‘तानाजी- द अनसंग वॉरियर’मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक रिलीज

ajay-devgan
आता मोठ्या पडद्यावर भारताच्या इतिहासात ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले त्या तानाजी मालुसरे या शूर मावळ्याचे पराक्रम पाहायला मिळणार आहेत. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ चित्रपट येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच मालुसरे यांच्या भूमिकेतील अजय देवगणचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.


हातात तलवार घेऊन आपल्याकडे येणाऱ्या शत्रूच्या हल्ल्याचा विरोध करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या रुपात या फोटोत तो दिसत आहे. या चित्रपटात अजयशिवाय सलमान खान शिवाजी महाराजांच्या तर काजोल शिवाजी महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. पण अद्याप या इतर भूमिकांबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही. ओम राऊत हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. १५० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु आहे. येत्या २२ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment