९९ वर्षाच्या आजीला ७७ वर्षानंतर मिळाले प्रेमपत्र

phylis
ब्रिटन मधील फाईलीस पोंटिंग या ९९ वर्षाच्या वृद्धेचे जीवन एकदम बदलून जाईल अशी घटना तिच्या आयुष्यात घडली. या आजीबाईना त्यांच्या नियोजित वराने ७७ वर्षापूर्वी लिहिलेले प्रेमपत्र नुकतेच मिळाले. बिल वॉकर लष्करी सेवेत होता आणि १९४१ साली दुसरया महायुद्धाच्या वेळी त्याचे जहाज अटलांटिक समुद्रात बुडाले होते. युद्धावर येण्यापूर्वी त्याने फायलीसपुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता आणि तो तिने मान्य केला होता. त्यावेळी बिल भारतात विल्टशायर रेजिमेंट मध्ये होता.

अर्थात बिलकडून त्यानंतर बरेच वर्षे काही कळले नाही तेव्हा फायलीसचा असा समज झाला कि बिलचे मन बदलले असावे. मात्र आता तिला त्याने पाठविलेले पत्र मिळाल्यावर सर्व खुलासा झाला. या पत्रात बिल लिहितो, हे पत्र तू वाचशील तेव्हा मीही तेथे असावे असे मला वाटते. तू होकार दिलास आणि मी आनंदाने रडलो. तुला माहिती आहे, मी तुझ्यासोबतच आनंदात राहू शकतो.

letter
फायलीस सांगते, तो जिवंत आहे कि नाही याची मला कल्पना नाही. त्याच्याकडून काही कळले नाही तेव्हा फायलीसने जिम होल्वे याच्याबरोबर विवाह केला. तिला चार मुले आणि ७ नातवंडे आहेत. जिमच्या निधनानंतर तिने दुसरा विवाह केला. आता तिला हे पत्र मिळाल्यावर आयुष्य बदलले असल्याचे वाटते.

हे पत्र कसे मिळाले ती हकीकत वेगळीच आहे. बिल ज्या जहाजात होता त्यावर ४८ टन चांदी त्यावेळी होती. या बुडालेल्या जहाजातील चांदीचा शोध सागरी संशोधक घेत होते तेव्हा त्यांना टीनच्या डब्यात घालून ठेवलेली अनेक पत्रे मिळाली. त्यातील एक फायलीसचे होते. बाकी पत्रे लंडनच्या पोस्टल म्युझीयम मध्ये ठेवली गेली आहेत.

Leave a Comment