नाकातील ड्रीप सह पर्रीकर मंत्रालयात

parrikar
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी नाकात ड्रीप असतानाही मंत्रालयात हजेरी लावली. सहकारी आणि पक्ष कार्यकर्ते यांनी पर्रीकरांचे स्वागत केले. फेब्रुवारीपासून पर्रीकर यांच्यावर स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे उपचार सुरु आहेत. १४ ऑक्टोबरला दिल्लीतील एम्स मधून डिस्चार्ज दिल्यानंतर पर्रीकर प्रथमच मुख्यमंत्री कार्यालयात आले.

काही दिवसांपूर्वी त्यांनी गोव्यात बांधल्या जात असलेल्या दोन पुलांची पाहणी केली होती तेव्हाही त्याच्या नाकात ड्रीप होती. पर्रीकर खूप अशक्त दिसत असून मंत्रालयात येताना त्यांना आधार द्यावा लागला. गोवा विधानसभेतील विरोधक आणि भाजप सोबत सत्तेत असलेले महाराष्ट्र गोमंतक पक्ष या दोघांनीही मुख्यमंत्री कार्यालयात हजर नसल्याने प्रशासनावरची पकड ढिली झाली असल्याचे आरोप केले होते त्या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांचे मुख्यमंत्री कार्यालयातील आगमन महत्वाचे मानले जात आहे.

Leave a Comment