जितेंद्र जोशीने कवितेच्या माध्यमातून मांडले समाजाचे भीषण वास्तव

jitendra-joshi
अभिनेता जितेंद्र जोशीने पिछले सालभर में न मेरी हत्या हुई, ना ही मुझपे बलात्कार हुआ, मैं गाय की तरह जिंदा हूँ यही चमत्कार हुआ, अशा शब्दांत समाजाचे विदारक वास्तव मांडले आहे. जितेंद्रने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून त्याने आपल्या कवितेच्या माध्यमातून समाजातील सध्याची परिस्थिती आणि भीषण वास्तव मांडले आहे.


त्याने या कवितेतून राम मंदिर आणि मशीदचा मुद्दादेखील मांडला आहे. जितेंद्रची सामाजिक तणावावर भाष्य करणारी ही पहिली कविता नाही. त्याने यापूर्वीदेखील अनेक कवितांतून आपले परखड मत मांडले होते. आता जितेंद्रने पुन्हा नवीन वर्षाच्या निमित्ताने वर्षभरातील समाजातील परिस्थिती काही ओळींतून मांडली आहे.

त्याने या कवितेचा आने वाले साल में अपनी आमदनी और बढाऊंगा, काट डालूं या कट जाऊं लेकिन यही गाऊँगा, हम होंगे कामयाब..हम होंगे कामयाब, अशा ओळीने शेवट केला आहे. सध्या सोशल मीडियावर या कवितेला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

Leave a Comment