इंटरनेटचे अंडरवर्ल्ड अर्थात डार्क वेब

darkweb
गुन्हेगारी जगतातील अंडरवर्ल्ड आपण नेहमी ऐकतो. त्याच धर्तीवर इंटरनेट दुनियेत डार्क वेब म्हणजे इंटरनेटचे अंडरवर्ल्ड काम करते आहे मात्र याची माहिती सर्वसामान्य लोकांना फारशी नाही. या अंधेरनगरीत घातक शस्त्रे, ड्रग्स, युजरची खासगी माहिती चोरणे, डेबिट क्रेडीट कार्ड, बँक डीटेल्स मिळविणे याचबरोबर नकली चलन असे अनेक अवैध कारभार चालतात. अनेक अवैध वस्तू येथे स्वस्तात मिळतात. विशेष म्हणजे आपण जे इंटरनेट वापरतो तो या वेब दुनियेचा फारच छोटा भाग असून त्याचा बराच मोठा भाग हा डार्क वेबने व्यापलेला आहे.

हे डार्क वेब सामान्य जगासमोर सहजी येत नाही. सायबर सिक्युरिटी फर्म कॅस्परस्काय लॅबने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार तुमची खासगी माहिती केवळ ३५०० रुपयात या ठिकाणी विकली जाते. त्यात सोशल मिडिया अकौंट पासवर्ड, बँक डीटेल्स, क्रेडीट डेबिट कार्ड माहिती असते. या वेबवरून ड्रग मोठ्या प्रमाणात विकले जाते आणि हे विक्रेते बहुदा परदेशात असतात. कुरिअर अथवा त्यांचे एजंट ड्रग डिलिव्हरी देतात. या वेबवर युजरची ओळख गुप्त असते.

या वेबसाठी साधारणपणे टीओआर किंवा ओनिअन ब्राउझरचा वापर केला जातो. हे डार्क वेब अमेरिकेची देणगी आहे. अमेरिकन आर्मीने हेरगिरीसाठी आणि दुसऱ्या देशांची गुपिते मिळविण्यासाठी त्याचा वापर सुरु केला हता. याची अनेक ओपन सोअर्स सॉफटवेअर उपलब्ध आहेत. त्याचा वापर व्हीओआयपी कॉल करण्यासाठी केला जातो. यात फेक फोन नंबर जनरेट केला जात असल्याने अवैध वस्तू विकणाऱ्याचा मग काढणे अवघड असते. हॅकर्सना त्यांच्या व्यवसायासाठी हे नंदनवनच. कंपन्याची, एखाद्या बड्या व्यक्तीचे, देशाची, व्यवसायाची अति संवेदनशील माहिती मिळवून हॅकर्स येथे विकतात आणि त्यातून प्रचंड पैसा कमावतात.

Leave a Comment