पहिल्यांदाच रॉजर फेडरर आणि सेरेना विलियम्सचा आमना-सामना

combo
पर्थ – टेनिस इतिहासातील दोन दिग्गज येथे सुरू असलेल्या हॉपमॅन चषक स्पर्धेत आमने-सामने येणार आहेत. पहिल्यांदाच स्वित्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स हे एकमेकांचा सामना करताना दिसतील. सध्याचा चॅम्पियन्स स्वित्झर्लंडचा मिश्र दुहेरीचा संघ अमेरिकेविरुद्ध भिडणार आहे. दोन महान टेनिसपटू एकमेकांसमोर येणार असल्याने चाहत्यांमध्ये या सामन्याची मोठी उत्सुकता आहे.

फेडररही या मुकाबल्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. या स्पर्धेतील सुरुवातीचा सामना रविवारी फेडररने जिंकला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, हा क्षण आम्हा दोघांसाठी खूपच रोमांचकारी असेल. मला वाटते हा सामना अधिक टेनिस चाहते पाहतील. मला नेहमीच सेरेनाच्या कोर्टवर आणि कोर्टबाहेरील कामगिरीने प्रभावित केले आहे. आम्ही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असल्यामुळे हा सामना चांगला होईल. पुढे फेडरर म्हणाला की, असा सामना पहिल्यांदाच होते आहे. यापुढे असे कधी होईल याची शक्यता खूपच कमी वाटते. सेरेना आमच्यासाठी मोठी प्रतिस्पर्धी आहे, तिच्याविरूद्ध खेळणे आव्हानात्मक आहे.

Leave a Comment