शास्त्री बुवांचे बिअर पिऊन विजयाचे सेलिब्रेशन, भडकले नेटीझन्स

ravi-shastri
मेलबर्न – पुन्हा एकदा सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री ट्रोल झाले आहेत. रवी शास्त्री मेलबर्न कसोटी सामना जिंकल्यानंतर हॉटेलमध्ये परतत असताना बिअर पिताना दिसले. हॉटेलला स्टेडिअममधून आल्यानंतर जेव्हा बसमधून शास्त्री उतरले तेव्हा त्यांच्या हातात बिअरची बाटली होती. ते बिअर पिताना व्हिडीओत कैद झाले आहेत. यानंतर सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

स्टेडिअममधून बसने हॉटेलला भारतीय संघ पोहोचणार असल्याने आधीच हॉटेलबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. भारतीय संघाची बस पोहोचताच चाहत्यांनी जल्लोष कऱण्यास सुरुवात केली. चाहते ढोल वाजवत इंडिया-इंडिया घोषणा देत खेळाडूंना शुभेच्छा देत होते. याचवेळी बसमधून सर्वात आधी रवी शास्त्री उतरले. त्यांच्या हातात यावेळी बिअर होती आणि विशेष म्हणजे बिअरचा घोट घेतच त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला.


रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बसमधून उतरला. यावेळी विराट कोहली आपल्या नेहमीच्या रिलॅक्स मूडमध्ये दिसत होता. ढोल वाजत आहेत म्हटल्यावर त्यानेही त्यावर ठेका धरला. हार्दिक पंड्यानेही डान्स करतच हॉटेलमध्ये प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारत सध्या मजबूत स्थितीत असून मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. 3 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना जिंकत एकीकडे भारत इतिहास रचण्याचा प्रयत्न करताना दिसेल तर मालिका ड्रॉ व्हावी यासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. मेलबर्नमध्ये भारताने 37 वर्षानंतर कसोटी सामना जिंकला आहे.

Leave a Comment