आजपासून स्वस्त झाल्या २३ वस्तू आणि सेवा

GST
नवी दिल्ली – २३ वस्तू व सेवावरील जीएसटी कपातीचा निर्णय केंद्र सरकारने डिसेंबरमध्ये घेतला. आजपासून सिनेमाचे तिकीट, टीव्ही आणि कॉम्प्युटरचे स्क्रीनच्या दरात कपात होणार असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी नव्या वर्षात ही भेट ठरणार आहे.

२३ वस्तुंवरील करात कपात जीएसटीच्या ३१ व्या परिषदेत करण्यात आली होती. संगीत पुस्तकांवरील कर माफ करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींना लागणाऱ्या वस्तुंवरील करात २३ टक्के कपात झाल्याने त्या स्वस्त होणार आहेत.

जीएसटी कर २८ टक्क्यावरुन १८ टक्के झालेल्या वस्तूंमध्ये ३२ इंचापर्यंत संगणक आणि टीव्हीचे असणारे स्क्रीन वापरण्यात आलेले व जुनी रबराचे टायर, लिथीयम आयन बॅटरीजच्या पावर बँक, व्हिडिओ गेमसह इतर खेळांना लागणाऱ्या वस्तू, १०० रुपयांहून अधिक किंमत असलेले सिनेमाचे तिकीट यांचा समावेश आहे.

तर ५ टक्क्यावरुन पूर्णपणे करातून वगळण्यात आलेल्या वस्तूंमध्ये भाजीपाला (न शिजवलेला), शीतगृहात ठेवलेला आणि कंटेनरमध्ये ठेवलेला भाजीपाला साठवून ठेवलेला भाजीपाला (उदा. सल्फर डायऑक्साईड गॅसचा वापर करुन साठवलेला भाजीपाला) , तृतीय पक्षाकडून देण्यात येणाऱ्या विमा हप्त्यावरील करात कपात करण्यात आली आहे. ही कपात १८ टक्क्यावरुन ६ टक्के असणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते काढणाऱ्यांना बँकेत बचत ठेवीदारांना करातून वगळण्यात आले आहे.

Leave a Comment