टि्वटरच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

donald-trump
वॉशिंग्टन – ट्विटरवरुन नागरिकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्यासोबतच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारा व्हिडिओ पण शेअर केला.

ट्रम्प यांनी नववर्षाच्या निमित्ताने अमेरिकेच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्यासाठी येणारे वर्ष आनंद व भरभराटी घेवून येईल. सध्या मी कामात व्यस्त असल्याने नववर्षाच्या पहिल्या दिवसाचा आनंद घेता येत नाही. परंतु, तुम्ही मात्र या दिवसाची मजा घ्या, असेही ते यावेळी म्हणाले. नववर्ष आपल्या देशाची भरभराट घेवून येणार असून आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. मागिल वर्षातही जनतेच्या समृद्धीसाठी आम्ही काम केले. यावर्षी पण तसेत काम करून जनतेसमोर नवा आदर्श निर्माण करु, असे ते म्हणाले.

Leave a Comment