मायावतींची काँग्रेसला पाठिंबा काढून घेण्याची धमकी

mayawati
नवी दिल्ली – मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून काँग्रेसला दिलेला पाठिंबा काढून घेण्याची धमकी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी दिली आहे. एक प्रेस नोट काढून त्यांनी एप्रिल २०१८मध्ये झालेल्या भारत बंदच्या वेळी निर्दोष लोकांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा या राज्यांमध्ये दिलेल्या पाठिंब्यावर विचार करावा लागेल, असा इशारा दिला.

एप्रिलमध्ये अनुसूचित जाती जमाती कायदा आणि शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. भाजपशासित राज्यांमध्ये त्यावेळी अनेक निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे जातिवाद आणि राजकीय द्वेषातून निर्दोषांना फसवण्यात आले, असा आरोप बसपने केल्यामुळे आता नवनिर्वाचीत काँग्रेसने या राज्यातील निर्दोष लोकांवरील गुन्हे मागे घ्या, असे बसपने म्हटले आहे.

मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बसपने पाठिंबा दिला असल्यामुळे मायावती यांनी काँग्रेसला या प्रकारची धमकी दिली आहे. यानंतर काँग्रेस काय प्रतिक्रिया देणार हे बघण्यासारखे आहे. मात्र, मायावतींच्या या धमकीने महाआघाडीवर परिणाम होणार, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment