
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नव्या लुक मुले सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे इन्स्टाग्राम वर मोदी यांनीच हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत नेहमीप्रमाणे मोदी त्यांच्या रॉयल लुक मध्ये नाही तर साध्यासुध्या पोशाखामुळे चर्चेत आले आहेत.
नव्या वेशातील मोदी सोशल मिडीयावर व्हायरल
हे फोटो अंदमानच्या पोर्टब्लेअर मधील आहेत. फोटो खाली कॅप्शन देताना मोदी लिहितात, सुंदर पोर्टब्लेअर. एक सुंदर सकाळ आणि सूर्योदयाची वेळ. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची आहुती दिली त्या आमच्या साहसी स्वातंत्र्यवीराच्या विचार डोक्यात आहे. या फोटोत मोदी झब्बा, लुंगी या वेशात दिसत असून त्यांच्या हातात एक फाईल आणि वही दिसते आहे. इन्स्टाग्राम वर मोदींचे १ कोटी ६० लाख फोलॉंअर असून २४३ फोटो शेअर केले गेले आहेत.
