नवी दिल्ली – नव वर्षाच्या मुहुर्तावर केंद्र सरकारने देशातील सर्वसामान्य नागरिकांना गिफ्ट दिले असून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडर १२०.५० रुपये तर अनुदानित गॅस सिलिंडर ५.९१ रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे.
नववर्षानिमित्त मोदी सरकारचे सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘गिफ्ट’
आता नव्या दरानुसार अनुदान असलेल्या घरगुती सिलेंडरची किंमत दिल्लीत ५००.९० रुपयांवरून ४९४.९९ रुपये प्रती सिलेंडरवर येतील. तर विना अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत ८०९.५० रुपयांवरून ६८९ रुपये प्रती सिलेंडर होतील. हे दर आजपासून लागू झाले आहेत. याबाबत आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, एलपीजीचे दर आंतर्राष्ट्रीय बाजारात घसरल्याने आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने घरगुती गॅसच्या दरात कपात करण्यात आली आहे. गॅसच्या दरात करण्यात आलेली वास्तविक कपात स्थानिक करांमुळे वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळी असेल.