देशातील ३ संस्कृत विद्यापीठांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा

satyapal-singh
नवी दिल्ली – मानव संसाधन विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी देशातील ३ संस्कृत विद्यापीठांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत निवेदन देण्यात आले असल्याचे सांगितले.

दिल्लीतील राष्ट्रीय संस्कृत संस्थान आणि लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तसेच तिरुपती येथील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचा यामध्ये समावेश आहे. ही मागणी संस्कृत विषयातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्कृत विषयाप्रती जाण निर्माण व्हावी, असा यामागील उद्देश असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment