मि. अॅन्ड मिसेस रोहित शर्मा झाले आई-बाबा

rohit-sharma
मुंबई – टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माला यावर्षाअखेरीस ‘गोड बातमी’ मिळाली असून रोहित शर्माची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रोहित शर्मा-रितिका लग्नाच्या तीन वर्षानंतर आई-बाबा झाले आहेत.


रोहित शर्मा वडिल झाल्याचे वृत्त एका क्रीडा वेबसाईटने दिले आहे. याबाबत अद्याप रोहित शर्मा किंवा रितिका यांच्याकडून कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात एका मुलाखतीत आपण बाप होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

Leave a Comment