नेत्रहीन सहज नोटा ओळखू शकतील असे अॅप

riserve
रिझर्व बँकेने नेत्रहीन व्यक्ती भारतीय चलनातील ५, १०, २०, ५०, १००, ५०० व २ हजाराची नोट सहज ओळखू शकतील असे एक अॅप सादर करत आहे. आजपर्यंत अंध व्यक्तींना नोटांना स्पर्श केल्यावर नोट ओळखावी लागत असे त्यापासून या अॅप मुळे मुक्ती मिळणार आहे. जून मध्येच या संदर्भातील घोषणा करण्यात आली होती.

हि सुविधा देण्यासाठी नवीन डिव्हाईस विकसित करण्यात आले आहे. हे उपकरण हातांचे चालविता येईल. म्हणजे या डिव्हाईस समोर, जवळ नोट धरता येणारे, किंवा डिव्हाईसच्या आत नोट घातली कि दोन सेकंदात हिंदी आणि इंग्रजी मध्ये नोट किती रुपयांची आहे त्याची माहिती दिली जाणार आहे. या साठी सॉफ्टवेअरचा आधार घेतला जात असून मोबाईल फोन / हार्डवेअरच्या मदतीने किंवा दोन्हींच्या मदतीने हे काम होऊ शकेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हार्डवेअरवर आधारित नोटा ओळखल्या जाणार असतील तर हार्डवेअर बॅटरीवर चालणारे, बॅटरी रिचार्ज करणारे, छोटे, पकडण्यास आरामदायक आणि जास्त प्रकाशाची गरज नसेल असे बनविण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे समजते. नवीन वर्षात हि सुविधा सुरु होईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment