भारताच्या या त्रिकुटाकडून मेलबर्न कसोटी सामन्यात ३४ वर्षापूर्वीचा जुना विक्रम मोडीत

trio
मुंबई – जेव्हा कधी वेगवान गोलंदाजीची चर्चा क्रिकेट जगतात व्हायची भारताचे नाव तेव्हा कधीच घेतले जात नव्हते. भारताची प्रतिमा आता बदलली असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी कांगारुंना एकहाती शरण आणले. कोणतेच उत्तर भारतीय तोफगोळ्यापुढे नव्हते. भारताला त्यांच्या या शानदार कामगिरीमुळे मालिकेत सहज विजय मिळाला. २०१८ या वर्षात भारताच्या या त्रिकुटाने तब्बल १३४ गडी बाद केले आहेत. विंडीजच्या होल्डिंग-गार्नर-मार्शल यांचा ३४ वर्षापूर्वीचा विक्रम त्यांनी मोडीत काढला आहे.

यावर्षात मोहम्मद शमी(४६), जसप्रीत बुमराह(४८) आणि इशांत शर्मा(४०) या त्रिकूटाने मिळून १३४ गडी टिपले. यापूर्वी माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग आणि जोएल गार्नर या दिग्गजांनी मिळून १९८४ विदेशात १३० गडी बाद केले.

पहिल्या डावात ६ गडी बाद करणाऱ्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ५३ धावात ३ गडी बाद केले. त्याने या सामन्यात एकूण ९ गडी बाद करत सामनावीरचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. तो या शानदार कामगिरीमुळे यंदाच्या वर्षात सर्वाधिक ७८ बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. आफ्रिकेच्या कागिसो राबाडाला त्याने पिछाडीवर टाकले. याचबरोबर ऑस्ट्रेलियात कसोटीमध्ये ८ पेक्षा जास्त गडी बाद करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत बुमराहने ३ वेळा ५ गडी टिपण्याचा पराक्रम केला आहे. भारताचा त्या प्रत्येक सामन्यात विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात पाच गडी घेणारा जसप्रीत आशियातील पहिला खेळाडू ठरला आहे.

बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाच्या लंबू अर्थात इशांत शर्माने बिशनसिंह बेदी यांना पाठीमागे टाकले. ९० सामन्यात ३० वर्षाच्या इशांतने २६७ गडी बाद केले आहेत. ६७ कसोटीत बेदी यांनी २६६ बळी मिळविले होते. इशांत आणि बेदी यांच्या पुढे जहीर खान (३११), रविचंद्रन अश्विन (३४२), हरभजन सिंह (४१७), कपिल देव (४३४) आणि अनिल कुंबले (६१९) हे गोलंदाज आहेत.

Leave a Comment