31 जानेवारीपासून लागू होणार ‘ट्राय’चे नवे केबल धोरण

Trai
नवी दिल्ली : ग्राहकांना पसंतीचे टीव्ही चॅनेल्स निवडण्याचे टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाचे (ट्राय) स्वातंत्र्य देणारे नवे केबल धोरण आता 29 डिसेंबर ऐवजी 31 जानेवारीपासून लागू करण्यात येणार असल्यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी महिन्याभराचा वेळ मिळणार आहे.

हा निर्णय ट्राय(TRAI) आणि ब्रॉडकास्टर्स, डीटीएच ऑपरेटर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला. ट्रायच्या नव्या नियमानूसार ग्राहकांना जे चॅनेल्स पाहायचे आहेत केवळ त्याचेच पैसे द्यावे लागणार आहेत. ट्रायचे सचिव एस. के. गुप्ता यांनी याबाबत माहिती देताना ग्राहकांच्या फायद्याची ही नवी नियमावली लागू करताना त्यांना आपल्या पसंतीचे चॅनल निवडण्यासाठी वेळ मिळावा यासाठी तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले.

यापूर्वी 29 डिसेंबरपासून ट्रायची नवी नियमावली लागू करण्यात येणार होती. पण ग्राहकांमध्ये आपल्या पसंतीचे चॅनल निवडायचे कसे याबाबत संभ्रम होता. या नव्या नियमांमुळे ग्राहकांचे टीव्ही पाहणे खूप स्वस्त होणार असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे.

Leave a Comment