1200 रूपयांपासून सुरू केली स्वत:ची कंपनी, आज त्या आहेत 37 हजार कोटींच्या कंपनीच्या मालक

kiran-muzumdar
देशातील सगळ्यात मोठी बायोफार्मा कंपनी असलेल्या बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ या असून त्यांची याकंपनी बाबतची गोष्ट खुपच प्रेरणादायी आहे. आज फोर्ब्सच्या जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. पण एक वेळ अशी होती की, दुसऱ्या कंपन्यांनी त्यांना नोकरी देण्यास नकार दिला होता. त्या महिला असल्यामुळे त्यांना या कपंन्या नोकरी देत नव्हत्या. पण त्यांनी निराश न होता स्वत:ची कंपनी केवळ 1200 रूपयांपासून सुरू केली आणि त्या आज 37 हजार कोटींच्या कंपनीच्या मालकिन आहेत.
kiran-muzumdar1
बंगळुरूमध्ये जन्मलेल्या किरण यांनी ऑस्ट्रेलियामधून 1978 साली ब्रूइंग दारू बनवण्याच्या प्रक्रियेत मास्टर्सची डिग्री घेऊन त्या मायदेशी परतल्या. त्यांनी त्याकाळी अनेक दारू बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. पण सगळ्या कंपन्यांनी त्या महिला असल्याचे कारण देउन त्यांना नोकरी देण्यास नकार दिला होता. त्यांच्या योग्यता असून देखील त्यांना नोकरी न मिळाल्यामुळे स्कॉटलंडला त्या गेल्या. त्यांनी तेथे ब्रूवरची नोकरी केली. त्यांचे नशीब तिथेच बदलले आणि बायोकॉनची सुरूवात झाली.
kiran-muzumdar2
आयरिश उद्योगपती लेस्ली औचिनक्लॉससोबत स्कॉटलंडमध्ये काम करताना त्यांची भेट झाली. भारतात फार्मास्युटिकल्स व्यवसाय लेस्ली यांना सुरू करायचा होता. किरण यांच्या कामातून त्या खुप प्रभावित झाल्या आणि किरण यांना त्यांनी भारतात कंपनी सुरू करून पार्टनर होण्याची ऑफर दिली. किरण सेस्ली यांचा प्रस्ताव पाहून खुप हैराण झाल्या, कारण त्यांना व्यवसायाचा कोणताही अनुभन नव्हता आणि त्यांच्याकडे गुंतवण्यासाठी पैसेही नव्हते. पण तरीही लेस्ली यांनी किरण यांना पार्टनर होण्यास तयार केले आणि अशा रितीने 1978 ला बायोकॉनची सुरूवात झाली.
kiran-muzumdar3
भारतात आपल्या व्यवसायाची किरण यांनी सुरूवात 1200 रूपयांची गुतंवणुक करून एका गॅरेजमधून केली. त्यांना नंतर माणसे जोडायला खुप अडचणी आल्या कारण एका महिलेसोबत काम करण्यास त्यावेळी कोणीही तयार होत नसे, फक्त पुरूषच नाही तर महिलांनादेखील अशा कंपनीत काम करायचे नव्हेत ज्याची बॉस एक महिला आहे. त्यांच्या कंपनीसाठी अनेक लोकांनी मुलाखती दिल्या पण कोणीही नोकरी करण्याच्या लायकीचा नसल्यामुळे शेवटी एका रिटायर्ड गॅरेज मॅकेनिकला त्यांनी आपला पहिला कर्मचारी बनवले.
kiran-muzumdar4
त्यांच्यासाठी व्यवसायासाठी पैशांची जुळवाजुळव करणेदेखील कठिण होते. एका 25 वर्षांच्या मुलीवर बँकदेखील विश्वास ठेवायला तयार नव्हती. एका महिलेने काही काळानंतर त्यांना कर्ज दिले आणि आपल्या कौश्यल्याच्या जोरावर त्यांनी बायोकॉनला देशातील सगळ्यात मोठ्या फार्मा कंपनीच्या यादीत नेले. आज कंपनीचा मार्केट कॅप 37000 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. किरण मजूमदार शॉ भारतातील एकट्या अशा बिझइनेसवुमन आहेत, ज्या आपल्या हिमतीवर अब्जाधीश झाल्या आहेत.

Leave a Comment