रोहित शर्माच्या घरी लवकरच हलणार पाळणा

rohit-sharma
मेलबर्न – टीम इंडियाचा ‘हीटमॅन’ रोहित शर्माच्या घरी लवकरच पाळणा हलणार असून या बातमी खुद्द रोहितनेही दुजोरा दिला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कसोबत केलेल्या एका मुलाखतीत रोहितने हे मान्य केले आहे. ही गोष्ट जेव्हा रोहितने भारतीय संघाला सांगितली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती तेही सांगितले.

रोहित मायकल क्लाकसोबतच्या या मुलाखतीत बाबा होण्याच्या आपल्या भावनेबद्दल बोलताना म्हणाला की, मी त्या क्षणाची फार आतुरतेने वाट पाहत आहे. आमचे आयुष्य बदलणारा तो क्षण असेल. मी ही गोष्ट जेव्हा सहकाऱ्यांनी सांगितली तेव्हा ते सरप्राइज झाले आणि नंतर हसायला लागले.

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली. १३ डिसेंबर २०१५ मध्ये रोहितने रितिकाशी विवाह केला होता. रितिका आणि रोहितची पहिली भेट २००९ मध्ये बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. त्यानंतर रोहितने रितिकाला त्याची स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून निवडले.

रितिकाही युवराज सिंगची मानलेली बहीण आहे. रोहित आणि रितिकाच्या भेटी गाठी हळू हळू वाढत गेल्या आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. रोहितने अखेर ६ वर्षांच्या मैत्रीनंतर ३ जूनला रितिकाला लग्नाची मागणी घातली. रोहितने अनोख्या पद्धतीने रितिकाला प्रपोज केले. रितिकाला घेऊन रोहित बोरिवली स्पोर्ट्स क्लब मैदानात गेला. येथूनच रोहितने वयाच्या ११ व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याने या मैदानात रितिकाला प्रपोज केले आणि ३ जून २०१५ ला प्रपोज केल्यानंतर दोघांनी त्यावर्षी १३ डिसेंबरला लग्न केले.

Leave a Comment