महापौरपदी विराजमान झाल्यानंतरही आजही घरोघरी जाऊन दूध विक्री करतात या महापौर

ajitha-vijayan
अजिथा विजयन (४७) या केरळच्या त्रिसूर महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्या तेथील महापौरपदी विराजमान झाल्या. पण त्यांनी महापौर झाल्यानंतरही आपले जुने काम सोडलेले नाही. महापौर पदाची मागील आठवड्यात शपथ घेतलेल्या अजिथा या दूध विक्रीचे काम मागील १८ वर्षांपासून करत आहेत. त्यांनी हे काम महापौर झाल्यानंतरही सुरु ठेवण्याचे ठरवल्यामुळे अजिथा यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर शहरामधील २०० घरांमध्ये मागील दोन आठवड्यापासून चक्क महापौर दूध विक्रीसाठी स्वत: येत आहेत.
ajitha-vijayan1
पद काय येते आणि जाते पण आपण आपले मूळ रुप बदलता काम नये, यावर केरळच्या त्रिसूर महापालिकेच्या महापौर अजिथा यांचा विश्वास आहे. कनीमंगलम प्रभागातून अजिथा निवडून आल्या. त्या त्यानंतर थेट महापौर झाल्या. त्यांच्या शपथविधीनंतर प्रभागातील अनेकांनी आता अजिथा काही उद्यापासून दूध टाकण्यासाठी येणार नसल्याचे गृहित धरून दूध घेण्यासंदर्भात इतरांकडून विचार करु लागले. पण अजिथा शपथविधीच्या दुसऱ्या दिवशीच पहाटे आपल्या लाल रंगाच्या स्कुटीवर दूधविक्री करताना दिसल्या. नेत्याने कितीही मोठे झाले तरी अहंकार न बाळगता पाय जमिनीवरच ठेवले पाहिजे. त्यामुळे खरे लोकतंत्र समजते. याद्वारे लोकांच्या संपर्कात राहून त्याच्या अडचणी समजून घेता येतात असे त्या म्हणतात. मागील १८ वर्षांपासून करत असणारे काम महापौर झाले म्हणून सोडून देणे मला पटत नाही. प्रत्येक कामाला आपले एक महत्व असते.

Leave a Comment