आतापर्यंत नफ्यात असलेली पतंजली पहिल्यांदाच तोट्यात

patanjali
नवी दिल्ली – गत पाच वर्षात पहिल्यांदाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समूहाला नुकसान झाले आहे. २०१३ पासून आतापर्यंत नफ्यात असणाऱ्या पंतजलीचे या वर्षात विक्रीतील घसरणीमुळे त्यांच्या नफ्यालाही फटका बसला आहे. पतंजलीला स्पर्धेत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या उतरल्याने आणि जीएसटीचा फटका बसला आहे.

बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्या नैसर्गिक आणि वनौषधी उत्पादन क्षेत्रात उतरल्यामुळे मार्च २०१८ ला संपलेल्या वित्त वर्षात पतंजली आयुर्वेद कंपनीची विक्री आणि नफा यात मोठी घट झाली आहे. वितरण व्यवस्थेत जीएसटीमुळे समस्या निर्माण झाल्याचा फटकाही पतंजलीला बसला आहे. याबाबत केअर रेटिंग्ज या संस्थेच्या अहवालानुसार, जीएसटीचा पतंजलीने वेळेत स्वीकार केला नाही, तसेच त्यासाठीच्या योग्य त्या पायाभूत सोयी आणि वितरण साखळी निर्माण केली नाही. याचा मोठा फटका बसून कंपनीची उलाढाल घटली आहे. दरम्यान, पतंजली समूहाने या मुद्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले आहे.

Leave a Comment