जम्मू-काश्मीरमधील 65 वर्षाच्या महिलेने दिला बाळाला जन्म

pregnancy
पुंछ- विज्ञानालाही बुचकळ्यात टाकणारी घटना जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये घडली आहे. एका 65 वर्षीय महिलेने नगरच्या राजा सुखदेव सिंह जिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. त्या नवजात बाळाचे स्वास्थ्यही उत्तम आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे. सामान्यतः एवढ्या वयस्कर महिलेला मुल होणे शक्य नसल्याचा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे. जवळपास वय वर्षं 50 असतानाच महिलांना पाळी येणे बंद होते. त्यामुळे वयस्कर महिलांची गर्भधारण करण्याची शक्यता फारच कमी असते. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही या घटनेने अचंबित झाले आहेत. नवजात कन्येच्या 80 वर्षीय वडिलांनी हा आम्हाला देवाचा आशीर्वाद असल्याचे म्हटले आहे.

80 वर्षीय हाकिम दीन आणि त्यांची 65 वर्षीय पत्नी पुंछमधल्या सूरनकोट तहसीलमधल्या मुगलरोडच्या किनाऱ्यावर सैला गावात राहते. ती गेल्या अनेक महिन्यांपासून गर्भवती होती. राजा सुखदेव सिंह यांनी महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या महिलेने तेथील महिला रोगतज्ज्ञ डॉ. शहनाज बट्टी यांच्या निगराणीखालीच सृदृढ बाळाला जन्म दिला आहे. देवाने दिलेले अद्भुत गिफ्ट असल्याचे हाकीम दीन यांनी म्हटले आहे. पण मुलाच्या संगोपनाचीही चिंता त्यांना या वयात सतावते आहे. तसेच प्रशासनाकडे त्यांनी मदतीचा हात मागितला आहे. जेणेकरून त्या लहान मुलीचे योग्य प्रकारे संगोपन करता येईल.

या दाम्पत्याला आधीही एक आठ ते 10 वर्षांचा मुलगा आहे. याबाबत माहिती देताना महिला रोगतज्ज्ञ डॉ. बट्टी यांनी सांगितले की, महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिची सामान्य प्रसूती झाली आहे. 65 वर्ष असे महिलेचे वय सांगितले जात असले तरी तिच्याकडे जन्मदाखला नसल्यामुळे महिलेचे वय 55 ते 58 वर्षांच्या मध्ये असल्याला दावाही रुग्णालय सीएमओ डॉ. मुमताज बट्टी यांनी केला आहे.

Leave a Comment