यंदाच्या वर्षात टीम इंडियाच्या गब्बरने लगावले सर्वाधिक चौकार

shikhar-dhawan
मुंबई – २०१८ हे वर्ष भारतीय खेळाडूसाठी खूपच चांगले गेले असून या वर्षात काही आकर्षक खेळी पाहायला मिळाल्या. ३ भारतीय खेळाडूंचा २०१८ या साली सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत बोलबाला राहिला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचा यात समावेश आहे.

या यादीत भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन पहिल्या स्थानावर आहे. त्याने यंदाच्या वर्षात १२७ चौकारंची आतषबाजी केली. १९ एकदिवसीय सामन्यात त्याने ८९७ धावा केल्या आहेत. खराब कामगिरीमुळे शिखर सध्या कसोटी संघातून बाहेर पडला आहे.

हिटमॅन रोहितचा टी-२० असो अथवा एकदिवसीय सामने असो फलंदाजीतला जलवा सुरूच आहे. यंदाच्या वर्षात रोहितने १९ एकदिवसीय सामने खेळले असून त्याने त्यात १०३० धावा केल्या आहेत. त्यात १०४ चौकार मारले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्यात विराटनंतर तो यावर्षी दुसऱ्या स्थानी आहे.

विराट कोहलीचा कसोटी अथवा वनडे सर्वत्र बोलबाला राहिला आहे. यंदाच्या वर्षात कोहलीने १४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १०० च्या सरासरीने त्याने १२०२ धावा केल्या आहेत. त्यात १२३ खणखणीत चौकारांची आतषबाजी केली. सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे विराट यंदाच्या वर्षात सर्वात कमी एकदिवसीय सामने खेळला आहे.

हे वर्ष पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज फखर जमानसाठी फार लकी राहिले आहे. यंदाच्या वर्षात त्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने वर्षभरात १७ एकदिवसीय सामन्यात ८७५ धावा केल्या आहेत. त्यात त्याने १०१ दणदणीत चौकार ठोकले आहे. तो सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. फखरने यंदाच्या वर्षात २ शतक आणि ६ अर्धशतके ठोकले आहेत. आतापर्यंत पाकिस्तानकडून फखरने २६ सामने खेळले आहेत. त्यात १२७५ धावा काढल्या आहेत. त्यात झिम्बाब्वेविरुद्धची २१० धावांची ऐतिहासिक खेळीचा समावेश आहे.

Leave a Comment