पैसे कसे खावे याचे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत प्रशिक्षण – अनिल गोटे

anil-gote
धुळे – आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावर असून आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. पैसे कसे खावे, याचे प्रशिक्षण या बैठकीत दिले जात आहे, अशी टीका भाजप आमदार अनिल गोटे यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक सुरू आहे. अनिल गोटे याठिकाणी आले असता, या बैठकीबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकप्रतिनिधींच्या बैठकीला आपण येणार आहोत. पण पोलिसांची आधी बैठक होऊन जाऊ द्या, त्या बैठकीत पैसे कसे खावे, याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची टीका यावेळी गोटे यांनी केली.

Leave a Comment