राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा भाजपच्या वाटेवर ?

radhakrishana-vikhe-patil
अहमदनगर – विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे यांनी वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून मी देखील काँग्रेसमध्येच राहीले पाहिजे असे काही नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. तसेच काँग्रेसचे माझे वडील नेते असले, तरी माझा पक्ष निवडण्याचा अधिकार मला आहे. स्वतंत्र नेतृत्व मला मान्य असेल, तर त्या नेतृत्वाकडे मी जाईल. माझ्या कुटुंबाचा त्यास विरोध असला, तरीही माझा निर्णय मी घेईल, असेही विखेंनी नमूद केले.

नेहमीच विरोधीपक्ष नेते राधाकूष्ण विखे-पाटील यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे सबंध असल्याने विखे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू असतात. त्यात विखेंचे पुत्र डॉ. सुजय यांना नगर लोकसभेची जागा लढवायची आहे. वेळोवेळी त्यांनी काँग्रेस पक्षाने तिकीट देवो अथवा नाही, मी निवडणूक लढवणारच असल्याचे म्हटले आहे.

विखे यांच्या या ताज्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. विखे यांच्या या भुमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राधाकुष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर आता सुजय विखेंच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत.

Leave a Comment