प्रदेशाध्यक्ष दानवेंनाच माहित नाही देशाचे पंतप्रधान, म्हणाले वाजपेयी होणार पंतप्रधान

raosaheb-danve
बुलडाणा – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सीएम चषक बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींच्या नावाचा विसर पडला. मोदींच्या ऐवजी त्यांनी अटलबिहारी वाजपेयींचे नाव घेतले. शेजारी बसलेल्या प्रदेश सरचिटणीस संजय कुटे यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी क्षमा मागत पंतप्रधान मोदी असे म्हटले.

पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, भाजप आणि समविचारी पक्षांचा एकच उद्देश आहे की, अटल बिहारी वाजपेयी या देशाचा पंतप्रधान व्हावे. त्यावेळी शेजारी बसलेल्या कुटेंच्या ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी दानवेंना मोदी-मोदी असे म्हणत, मोदी म्हणा असा इशारा केल्यामुळे लगेचच दानवे यांनी सावरत क्षमा मागत पंतप्रधान मोदी, असे म्हटले.

त्यांनी यावेळी भाजप-शिवसेनेच्या युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, सध्या कोणतीही वक्तव्ये शिवसेनेकडून करण्यात येत असली तरी, युतीचा प्रश्न त्यांनी जनतेवर सोडला असल्याचे सांगितले आहे. राज्यातील जनतेची इच्छा आहे की, भाजप-सेनेची युती व्हावी.

Leave a Comment