अशी असेल 20 रुपयांची नवी नोट

newnote
रिझर्व बँक लवकरच २० रु. मूल्याची नवी नोट जारी करणार असून नोटबंदी नंतर बँकेने ५, १०, ५०, १००, २००, ५०० आणि २ हजार रु. मूल्याच्या नव्या नोटा पूर्वीच जारी केल्या आहेत. २० रु.ची नवी नोट म.गांधी सिरीज मधली असेल मात्र त्याचा आकार आणि डिझाईन वेगळे असणार आहे. हि नवी नोट आकाराने जुन्या नोटेपेक्षा लहान असेल. नवीन नोट नंबर पॅनल मध्ये एस हे इंग्रजी अक्षर असेल.

या नोटेवर गव्हर्नरची सही आणि महाराष्ट्रातील युनेस्कोने जागतिक वारसा यादीत सामील केलेल्या अजंता गुहांचा फोटो असेल. नोटेच्या डाव्या बाजूला असलेला इंडेटीफीकेशन मार्क काढला जाणार आहे. ही नोट सर्व सुरक्षा फीचर्स सह असेल. मुख्य बदल रंग आणि स्मारकात केला जाणार आहे असे समजते.

Leave a Comment