बाबा आमटेंच्या कार्याला डूडलद्वारे गुगलचे अभिवादन

google
मुंबई – गुगलने खास डूडलद्वारे कुष्ठरोग्यांसाठी झटणारे, त्यांना मानाचे जीवन जगायला शिकवणारे समाजसेवक बाबा आमटे यांना अभिवादन केले. डूडलने आज (बुधवार) त्यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीची आवर्जून दखल घेतली. त्यांच्या जीवनात त्यांनी वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा सामाजिक चळवळींमध्येही सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

२६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म झाला. वकिलीचे शिक्षण त्यांनी नागपुरात पूर्ण केले. त्यांनी काही काळ वकिली केल्यानंतर कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील आनंदवन येथे आश्रम सुरू केले. ते आयुष्यभर कुष्ठरोग्यांसाठी झटत राहिले.

Leave a Comment