भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच आणणार २० रुपयांच्या नवीन नोटा

RBI1
नवी दिल्ली – लवकरच २० रुपयांच्या नोटांची छपाई भारतीय रिझर्व्ह बँक करणार असून आरबीआयने नोटाबंदीनंतर १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये, २०० रुपये, ५०० रुपये तसेच २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत.

२० रुपयांच्या नोटांची छपाई नोव्हेंबर २०१६ मध्ये छापण्यात आलेल्या महात्मा गांधी नव्या श्रेणीच्या नोटामध्ये होणार आहे. पूर्वीच्या नोटेहून नव्या २० रुपयाच्या नोटेचा आकार आणि डिझाईन भिन्न आहे. या श्रेणीतील ५०० रुपये व १ हजार रुपयांच्या नोटा वगळता सर्व नोटा चलनात आहेत.

याबाबत आरबीआय डाटा बँकच्या माहितीनुसार ३१ मार्च २०१६ अखेर २० रुपयांच्या ४.९२ कोटी नोटा या चलनात वितरित करण्यात आल्या आहेत. मार्च २०१८ पर्यंत हा आकडा दुप्पट होउन १० कोटी एवढा झाला आहे. एकूण चलनापैकी २० रुपयांच्या ९.८ टक्के नोटा मार्च २०१८ अखेर चलनात आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० रुपयांचे नाणे चलनात आणले आहेत.

Leave a Comment