आता अवघ्या दोन दिवसांत होणार मोबाईल नंबर पोर्ट

mobile
मुंबई : स्पर्धेच्या युगात प्रत्येक मोबाईल कंपनीकडून आपल्या ग्राहकाला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असतो. आपल्याकडे ग्राहकांना ओढण्यासाठी नवनव्या ऑफर कंपन्यांकडून देण्यात येतात. पण मोबाईल कंपनी काहीवेळा बंद होत असल्यामुळे किंवा चांगली सेवा कंपनीकडून न दिल्याने ग्राहक आपला नंबर दुसऱ्या कंपनीत पोर्ट करतात. ग्राहकाला नंबर पोर्ट करताना किमान आठवडाभर वाट पाहावी लागते. ग्राहकाला यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आता मोबाईल नंबर पोर्टिग करण्याची प्रक्रिया सोप्पी आणि जलद झाली आहे. या नियमात भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (trai) बदल केले आहेत. मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

एका सर्कलमधील मोबाईल नंबर पोर्ट करायचा असल्यास दोन दिवसांत ही प्रकिया पूर्ण होणार आहे. दोन वेगळ्या सर्कलमधील मोबाईल नंबर पोर्ट करायचे असतील तर यासाठी चार दिवसांचा वेळ लागणार असल्याची माहिती ‘ट्रायने’ दिली. आमचे लक्ष ग्राहकांना चांगली सेवा देण्याकडे आहे, आम्ही यासाठीच असे निर्णय घेत असल्याचे ट्रायने सांगितले.

कंपनीकडून मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी दिरंगाई होत असेल तर, १० हजारांचा दंड कंपनीला द्यावा लागेल. एका सर्कलदरम्यान नंबर पोर्ट करण्यासाठी कमाल ४८ तासांची मर्यादा आहे. तर ही मर्यादा कॉर्पोरेट कनेक्शनसाठी ४ दिवसांची आहे. तसेच युनिक पोर्टिंग कोडची वैधता ही आधी १५ दिवसांची होती. ही मर्यादा आता कमी करुन ४ दिवस करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर, आसाम आणि उत्तरेतील राज्यांसाठी हा नियम लागू नसेल. युनिक पोर्टिंग कोडची वैधता या राज्यासांठी ३० दिवसांची आहे. पोर्टिंगसाठी ग्राहकाने पाठवलेली विनंतीदेखील रद्द करण्यासंदर्भातील नियम शिथिल करण्यात आले आहेत. ही विंनती एक टेक्स्ट मेसेजद्वारे पोर्टिंग रद्द करता येईल. कॉर्पोरेट कनेक्शन असलेल्या ग्राहकांना एका पत्राद्वारे ५० ऐवजी १०० विनंत्या रद्द करता येतील.

मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी, ग्राहकाला एक युपीसी कोड (युनिक पोर्टिंग कोड) तयार करावा लागतो. आपल्या मोबाईल वरुन यासाठी PORT टाईप केल्यावर एक स्पेस देऊन १९०० या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे. ग्राहकाला यानंतर यूपीसी कोड पाठवला जातो. सर्व्हिस प्रोव्हायडर हा कोड बदलताना द्यावा लागेल. सोबतच ग्राहकाला आधार नंबर द्यावा लागेल. तसेच एक फॉर्म भरावा लागणार आहे. याआधी जर ग्राहक पोस्टपेड असेल तर जुने बिल नजीकच्या कार्यालयात जमा करावे लागते.

Leave a Comment