२५ फेब्रुवारीला आंगणेवाडी भराडी देवीची वार्षिक यात्रा

anaganewadi
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी मालवण येथील प्रसिद्ध भराडी देवीची ख्याती सर्वदूर पसरलेल्या लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून नुकतीच देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानुसार सोमवार २५ फेब्रुवारी २०१९ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

सर्व राज्याचे आणि भक्तांचे आंगणेवाडीची यात्रा कधी होणार याकडे लक्ष लागले होते. यावर्षी येथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांचा जागर पाहावयास मिळेल. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक झाल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली. मालवण येथील आंगणेवाडी यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानुसार सोमवारी २५ फेब्रुवारी २०१९ ला यात्रा होणार आहे.

Leave a Comment