शीतलामाता मंदिरात राक्षस पितो घड्यातील पाणी

sheetala
भारतात मंदिराची कमी नाही तसेच चमत्कारी मंदिरांचीही कमी नाही. राजस्तानातील पाली जिल्यात असलेले शीतलामाता मंदिर अश्याच एका चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात वर्षातून दोनवेळा एक घडा ठेवला जातो म्हणजे घागर ठेवली जाते आणि त्यात लाखो लिटर पाणी ओतले तरी ती भरत नाही. हे पाणी राक्षस पितो असा समज आहे. हे मंदिर ८०० वर्षे जुने आहे आणि गेली ८०० वर्षे घड्यात पाणी ओतण्याची परंपरा येथे पाळली जात आहे.

याची कथा अशी सांगतात, बाबरा नावाचा एक राक्षस होता आणि तो या गावात लग्न असेल त्यादिवशी नवऱ्यामुलाला ठार मारत असे. त्याच्या त्रासाने वैतागलेल्या लोकांनी शितलादेवीला आवाहन केले तेव्हा एका ब्राह्मणाच्या स्वप्नात देवी आली आणि तुझ्या पोटी मुलीचा जन्म घेईन असे सांगितले. देवी म्हणाली मी जेव्हा लग्नायोग्य होईन तेव्हा या राक्षसाचा वध करेन.

mandir
देवीने खरोखर ब्राह्मणापोटी जन्म घेतला आणि तिचे लग्नाचे वय झाले तेव्हा या राक्षसाचा वध केला. मरताना राक्षसाने एक इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला येथे उन्हाळ्यात फार तहान लागते तेव्हा पाणी पाजा. त्यावर देवीने वर्षातून दोन वेळा राक्षसाला पाणी देण्याचे वचन दिले. त्या नुसार वर्षातून दोन वेळा येथे घडा ठेवला जातो आणि महिलावर्ग डोक्यावरून आणून लाखो लिटर पाणी त्यात ओततात. हे पाणी राक्षस पितो त्यामुळे घडा भरत नाही असा समज आहे.

अनेक संशोधकांनी येथे घागरीत ओतलेले लाखो लिटर पाणी जाते कुठे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आजही हे कोडे उलगडलेले नाही. विशेष म्हणजे पुजारी जेव्हा देवीच्या पावलांना दुधाचा स्पर्श करून जेव्हा या घड्यात ते भरतो तेव्हा हा घडा भरतो. हे दोन दिवस येथे यात्रा भरते.

Leave a Comment