आंतरराष्ट्रीय वेश्याविरोधी अत्याचार निर्मूलन दिवस या राक्षसामुळे पाळला जातो

sex-worker
वेश्यांवर होणाऱ्या हिंसाचार विरोधात दरवर्षी १७ डिसेंबर रोजी International Day To End Violence Against Sex Workers पाळला जातो. मुळात गॅरी लियोन रिजने वेश्यांवर केलेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेऊन हा दिन पाळण्याची सुरुवात करण्यात आली आहे. ग्रीन रिव्हवर किलर असेही गॅरी याला म्हटले जाते. १९८० ते १९९०च्या दरम्यान त्याने ४८ महिलांची हत्या केली होती. वेश्यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होता. सुरुवातीला त्याने मर्डर केलेल्या ५ महिलांचे मृतदेह ग्रीन रिव्हरच्या किनाऱ्यावर सापडले होते. त्यामुळेच त्याला या नदीवरून नाव देण्यात आले होते.
sex-worker1
तो महिलांसोबत शारीरिक संबंध झाल्यानंतर त्यांचा गळा आवळून ठार मारत होता. त्याने काही महिलांना पाशवी अत्याचार करून ठार मारले होते. तो त्यांची कत्तल केल्यानंतर मृतदेह जंगलात घेऊन जात होता. त्याच ठिकाणी नेऊन चक्क तो मृतदेहांवर सुद्धा बलात्कार करायचा.
sex-worker2
त्याने कित्येक मृतदेह जंगलांमध्येच आणि नदीत फेकले होते. त्याने त्या मृतदेहांवर सुद्धा बलात्कार केल्याचे पुरावे सापडले आहेत. त्याला ३० नोव्हेंबर २००१रोजी ४ महिलांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. कसून पोलिस चौकशी केली असता त्याने ७ महिलांची हत्या केल्याचे कबुल केले. त्याने यानंतर झालेल्या चौकशीत ७ नव्हे, तर तब्बल ४८ महिलांसोबत असेच केल्याचे उघडकीस आले. पीडित महिलांपैकी बहुतांश महिला वेश्या होत्या.

Leave a Comment