मोहम्मद शमी या वर्षातला सर्वात यशस्वी गोलंदाज

mohammad-shami
पर्थ – २०१८ या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये देश-विदेशात भारताच्या या वेगवान गोलंदाजाने सर्वात चांगली गोलंदाजी केली आहे. पर्थ कसोटीतील दुसऱ्या डावात २ गडी बाद करून मोहम्मद शमी २०१८ वर्षात भारताकडून सर्वात जास्त गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. यंदाच्या वर्षात शमीने ४० गडी बाद केले. शॉन मार्शला बाद करत शमीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

शमीने २०१८ मध्ये २८.४२ च्या सरासरीने ११ कसोटीत ४० गडी बाद केले आहे. त्यात ४० धावा देत ५ गडी बाद अशी सर्वोत्तम कामगिरीही त्याने केली आहे. २०१८ च्या वर्षात जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जास्त गडी बाद करण्याचा पराक्रम आफ्रिकेच्या कगीसो रबाडाने केला आहे. ९ कसोटीत त्याने ४६ गडी बाद केले आहे. त्यानंतर नॅथल लियॉनने ४५ गडी बाद केले आहेत. पर्थच्या दुसऱ्या कसोटीत तो रबाडाला मागे टाकू शकतो.

भारताकडून आर. अश्विन यंदाच्या वर्षात सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. यावर्षी त्याने ३९ गडी बाद केले आहे. तर इशांत आणि बुमराह यांनी प्रत्येकी ३७ गडी बाद केले आहेत. भारताला यावर्षी अजून एक कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे.

Leave a Comment